-->
करमाळादेश

पेपरफुटीविरोधात करमाळ्यात नागरी कृती समितीचे आंदोलन; विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देत करमाळा तालुका नागरी कृती समितीच्या वतीने करमाळ्यात आंदोलन करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. डॉ. अमोल दुरंदे आणि ॲड. सविता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले असून यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला आहेे.

 

आंदोलकांनी सांगितले की, देशभरात वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. नुकत्याच झालेल्या NEET परीक्षेतील पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततापूर्ण आंदोलन करणारे शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी सोनम वांगचुक तसेच विद्यार्थ्यांशी प्रशासनाने केलेल्या वागणुकीचाही आंदोलकांनी निषेध केला.

यावेळी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करावी, पेपरफुटी प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा द्यावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

 

या आंदोलनात डॉ. जयंत कापडी, औदुंबर राजेभोसले, मानसिंग खंडागळे, अंगद देवकाते, आबासाहेब टापरे, स्वप्निल जाधव, शंकर कुलकर्णी, डॉ. सुजीत शिंदे, ॲड. कोमल गोरे, ॲड. स्वाती सपकाळ, ॲड. योगेश शिंपी, ॲड. नवनाथ राखुंडे, ॲड. सौरव शिंपी यांच्यासह करमाळा परिसरातील अनेक नागरिक सहभागी झाले होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close