-->
करमाळामहिलाविषयकराजकिय

करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केम येथून शिव संपर्क अभियानास सुरुवात

 

केम प्रतिनिधी

शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आगामी काळात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी व एक हाती सत्ता आणण्यासाठी शिव संपर्क अभियान राबवून घराघरातून शिवसेना सदस्यांची नोंदणी करणे या अनुषंगाने शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केम येथे वर्षा ताई चव्हाण यांनी शिवसेना महिला आघाडीची बैठक घेतली. सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी चव्हाण मॅडम यांनी शिवसेना संपर्क अभियानाची माहिती सांगून महिला सदस्यातून शिव संपर्क अभियानाचे फॉर्म भरून नोंदणी केली आणि या शिव संपर्क अभियानास प्रारंभ केला.

यावेळी वर्षाताई चव्हाण मॅडम म्हणाल्या की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यानी केलेल्या आवाहनानुसार शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घरा घरात जाऊन शिवसेनेचे विचार पटवून देणे व कोरोना काळात झालेल्या लसीकरणाच्या आढावा घेणे. तसेच जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे व घराघरात शिवसेना सदस्यांची नोंदणी करणे. पक्ष वाढीसाठी गट तट न पाहता आपण बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक आहोत ही भावना ठेवून काम करा असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी मोठ्या प्रमाणावर शिवसेना महिला सदस्य नोंदणी केली.

यावेळी आशा मोरे, मंजुळा प्रसार, रोहिणी वागणे, राणी तळेकर, मनिषा दौंड, सरस्वती कुराडे, ज्ञानेश्वरी केंगार, आयशा पठाण, रेश्मा देवकर, पुजा देवकर, नजमुला पठाण, अंजली लोखंडे, सायली चव्हाण, सुबोधिता दौंड, मंगल तारे, शोभा शिंदे आदि महिला उपस्थित होत्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close