-->
करमाळाराज्य

आमदार पुत्रांनी ही मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे; मराठा समन्वयक सचिन काळे यांचे आवाहन

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालूक्यातील युवा नेत्यांनी म्हनजेच आजी व माजी आमदार तसेच त्यांच्या पूत्रांनी सुद्धा आता मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले पाहीजे. असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे करमाळा तालुका समन्वयक सचिन काळे यांनी केले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, करमाळा तालूक्याचे आमदार व माजी आमदार पुत्रांना मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागणार असून तसे मी आवाहन करत आहे. विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांचे चिरंजीव यशवंत भैया शिंदे यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारून आक्रमक झाल पाहीजे आणि प्रसंगी आमदार वडीलांना त्यांचा राजीनामा सुद्धा देन्यास भाग पाडावे आणि तस ते करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्याचप्रमाणे माजी मंत्री दिगंबरराव बागल व माजी आमदार शामलताई बागल यांचे चिरंजीव दिग्वीजय बागल यांनी सुद्धा रसत्यावर उतरावे. तसेच करमाळा तालूक्याचे माजी आमदार जयवंतरावजी जगताप व त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी आता शांत न बसता मराठा समाजासाठी मोठा लढा उभा करावा. माजी आमदार नारायन पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनी ही मराठा आरक्षनाचा मुद्दा चांगला लाऊन धरला पाहीजे.

वरिल पैकी सर्व आमदार व माजी आमदार यांच्या पुत्रांनी मराठा आरक्षणासाठी आपले सर्वस्व पनाला लाऊन रस्त्यावर उतरावे व मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.अन्यथा मराठा समाजातील युवक व युवती आपनास येनाऱ्या काळात कधीही माफ करनार नाहीत व त्याचे पुढील राजकारनात ही सहकार्य करनार नाहीत. याची दखल घ्यावी ही विनंती.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close