-->
करमाळासामाजिक

दिवेगव्हाणमध्ये स्वातंत्र्य दिनी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करमाळा तालुक्यातील दिवेगव्हाण गावात कै. अंबादास भगवान खाटमोडे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. गावातील सर्व ग्रामस्थांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

 

यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात वाचनाची आवड वाढावी, विद्यार्थी व युवकांना विविध पुस्तके, वर्तमानपत्रे आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी साहित्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हे सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे.

 

वाचनालयामुळे गावातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगली सुविधा मिळणार असून, ग्रामस्थांमध्ये वाचनाची सवय वाढण्यासही मदत होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गावात वाचनालय सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे दिवेगव्हाण गावातील शैक्षणिक आणि वाचन संस्कृतीला नवी दिशा मिळणार असून, वाचनालयाचा विद्यार्थ्यांसह सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close