-->
तंत्रज्ञानसामाजिक

आयडिया टॉवरची अवस्था “असून अडचण, नसून खोळंबा”

केम प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या केम या गावातील वीज पुरवठा खंडित झाल्यावर आयडियाच्या सिम कार्ड धारकांना नेटवर्क येत नसल्याची तक्रार केम येथील नागरिकांमधून केली जात आहे. तसेच आयडियाचे इंटरनेट स्पीड हे फक्त नावालाच 4 जी आहे, प्रत्यक्षात मात्र 2 जी च्या स्पीड सारखंच चालत आहे.
त्यामुळे केम येथील आयडिया सिम कार्ड धारकांची मोबाईल नेटवर्क टावरच्या बाबतीत मात्र “असुन अडचण आणि नसून खोळंबा ” अशी अवस्था झाली आहे. केम येथील आयडिया टॉवरचा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर जनरेटर चालू करून नेटवर्क मिळाले पाहिजे आणि आयडिया इंटरनेटला पण 4 जी चाच इंटरनेट स्पीड आला पाहिजे अशी मागणी केम येथील आयडिया सिम कार्ड धारकांकडून होत आहे. अन्यथा आयडिया चे ग्राहक दुसऱ्या नेटवर्क कंपनी मध्ये आपले सिम कार्ड पोर्ट करणार आहेत.
तरी करमाळा तालुका आयडिया मोबाईल नेटवर्क कंपनी च्या संबंधित अधिकार्यांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून आपल्या ग्राहकांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केम येथील नागरिकांतुन होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close