-->
आरोग्यविशेष

आरोग्यविषयक: खोबरेल तेलाचे १० फायदे; ‘या’ टिप्समुळे खुलेल तुमचं सौंदर्य !

 

 

 

आपल्या रोजच्या वापरातील खोबरेल तेलाचे अनेक गुणधर्म आहेत. खोबरेल तेलाच्या या १० आयुर्वेदिक गुणकारी फायद्यामुळे खुलेल तुमचं सौंदर्य.

 

१. डोळ्याखाली खोबरेल तेलाने दररोज मसाज केल्यास डोळ्याखाली सुरकुत्या पडत नाही. डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळेही निघून जातात.

२. खोबरेल तेल मिश्रित गरम पाण्याने अंघोळ केल्यास स्कीन टोन सुधारतो.

३. खोबरेल तेलात कोअर्स शुगर (coarse sugar, या साखरेचे दाणे आकाराने थोडे मोठे असतात) मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते. ज्यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते.

४. मेकअप रिमूव्हर – कदाचित अनेक महिलांना माहिती नसेल पण खोबरेल तेल हे उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करते. मेकअप काढण्यासाठी आपण बऱ्याचदा बाजारात मिळणारे वेगवेगळे रसायनयुक्त रिमूव्हर विकत घेतो. पण त्याऐवजी खोबरेल तेलाने मेकअप काढला तर त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नाही.

५. खोबरेल तेलाने चेहरा उजळण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेल आणि मध समप्रमाणात घेऊन त्याचे फेसपॅक तयार करावे. हे फेसपॅक चेहऱ्याला लावावे. नैसर्गिक फेसपॅकमुळे चेहरा उजळतो.

६. खोबरेल तेल कोणत्याही प्रकाराच्या त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम होते.

७. खोबरेल तेलाने जखमेवरील दाह कमी होतो. जर तुम्हाला चटका लागला तर भाजलेल्या ठिकाणी खोबरेल तेल लावावे. होणारा दाह लवकर कमी होतो.

८. चेहऱ्यावर पुरळ येत असलीत तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.

९. सतत आपण केसांवर केमिकलयुक्त शॅम्पू, कंडिशनरचा मारा करत असतो. यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. केसगळतीचे प्रमाण वाढते. तुम्ही देखील अशा समस्येचा सामना करत असाल तर आठवड्यातून एकदा खोबरेल तेलाने केसांना मसाज करावा. यामुळे केसगळतीचे प्रमाण कमी होते आणि कोंड्याची समस्या देखील दूर होते.

१०. जर अंगावर लाल चट्टे किंवा खाज येत असेल तर खोबरेल तेलाच्या वापरामुळे आराम मिळतो.
Cp भारतीय आयुर्वेद व घरगुती उपचार गृप

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close