-->
करमाळाविशेषसामाजिक

‘या’ गावातील शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांकडून सन्मान

करमाळा प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील कोंढेज या गावामध्ये सन २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी, इयत्ता बारावी, तसेच इतर स्पर्धा परीक्षा व पदवी परीक्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी कोंढेज ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी आरणे, सोसायटी चे सदस्य युवा नेते श्री. रामचंद्र आदलिंग, ग्रामपंचायत सदस्य किरण चांगण, सोसायटीचे व्हा. चेअरमन श्री. आकाश लोंढे, सोसायटीचे मा. चेअरमन चंद्रकांत आदलिंग, श्री. सुरेश इंगोले, युवा नेते आप्पासाहेब आरणे, संभाजी ब्रिगेडचे तालुका उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब साबळे, विद्यार्थी परिषदेचे करमाळा तालुका उपाध्यक्ष प्रशांत (भाऊ) लोंढे, समाधान लोंढे व सर्व युवक मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून समस्त ग्रामस्थ, युवक वर्ग, विद्यार्थी मित्र आणि पालक वर्ग यांच्या उपस्थितीत या सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कोैतुक करण्यात आले. तसेच त्यांना भावी वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.

इयत्ता १२ वी मध्ये यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी

१) कु. तनुजा रमेश करे- ९२%
२) चि. अशोक कृष्णा आरणे- ८६.३३%
३) चि. ओम संतोष महामुनी- ८६%
४) कु. दिव्या महादेव बोराडे- ८२%
५) चि. प्रसाद उमेश वारे- ८१.१७%
६) कु. काजल भागवत लोंढे- ८१%
७) कु. अमृता बंडू आरणे- ८६.६६%
८) चि. महावीर दत्तात्रय आदलिंग- ७०%

इयत्ता १० वी मध्ये यश संपादन केलेले गुणवंत विद्यार्थी

१) कु. कृष्णाई श्रीकांत कपूर- ८४.२०%
२) कु. गायत्री दादासाहेब गुरव- ९०.००%
३) कु. वैष्णवी शंकर सव्वासे- ८२.००%
४) चि. सौरभ कालीदास राऊत
५) चि. आदित्य सुभाष इंगोले
६) चि. किरण दशरथ लोंढे- ७६.००%

कोंढेज या गावतील चि. आदीत्य आदीनाथ राऊत या विद्यार्थ्याने सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत ३०० पैकी २४९ गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. तसेच त्याची सातारा सैनिक स्कूल येथे निवड झाल्याबद्दल त्याचाही सन्मान करण्यात आला.

गावातील चि. स्वप्नील बाळासाहेब बोराडे या विद्यार्थ्याने इंजिनिअर (BE- e & tc) अतिंम परीक्षा ९७% गुण मिळवून पास झाल्याबद्दल त्याचा ही सत्कार ग्रामस्थांकडून करण्यात आला.

तसेच कोंढेज गावासाठी अभिमानास्पद ठरलेली बाब म्हणजे पाणी फाऊंडेशन आयोजीत “समृद्ध गाव” स्पर्धेत कोंढेज गावाचा सन्मान झाला. या पाणी फाऊंडेशन साठी अविरत झटणारे श्री. बापू आदलिंग यांचाही सन्मान करुन त्यांना गौरविण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close