हवेली प्रतिनिधी/प्रविण शेंडगे


हवेली ०१ थेऊर ग्रामपंचायत येथील शाहू फुले आंबेडकर भवनात अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी सर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
जयंतीचा अनावशक खर्च टाळून कोल्हापूर, सांगली येथील महापुरामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री आर्थिक सहाय्यता निधीला (२१ हजार) चा धनादेश मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन (दिल्ली) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. खंडू (शेठ) गावडे यांच्यातर्फे लोणी काळभोर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी मारुती दादा कांबळे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून, या देशातील कोट्यावधी श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे. असे सांगून आपल्या साहित्यातून व लेखनातून समाजाचे वास्तववादी चित्र मांडणारे व दीड दिवसाच्या शालेय जीवनातून कथा, कादंबरी व साहित्य यांच्या माध्यमातून समाजाला जागे करण्याचे काम अण्णाभाऊंनी केल्याचे सांगितले.
यावेळी लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी बोलताना सांगितले की, तरुणाने मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन महापुरुषांचे आचार, विचार, साहित्य वाचून सर्वसामान्य समाजामध्ये पोहोचविले पाहिजे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्या गौतमी मारुती कांबळे यांनी केले होते. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहदेवजी खंडागळे यांनी केले.
या कार्यक्रमा वेळी थेऊर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी सर ,पोलीस हवालदार जाधव साहेब, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवरण संघटन (दिल्ली) पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री खंडू शेठ गावडे, आरपीआयचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती (दादा) कांबळे, दलित महासंघ महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष आनंदजी वैराट, दलित महासंघाचे हवेली तालुका अध्यक्ष सहदेवजी खंडागळे, कालिदास गावडे, देवा गावडे, मल्हारी रंधवे, रणदीप आखाडे, शिवाजी कांबळे, राहुल गायकवाड, सचिन आखाडे, भगवान (अण्णा) शेडगे, सागर धारवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.




