करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मांगी येथील धोकादायक व गंजलेले विजेचे लोखंडी पोल बदलावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, संजय मामा शिंदे मोटार वाहतूक सहकारी संस्थेचे सचिव सुजित तात्या बागल यांनी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मांगी गावातील विजेचे लोखंडी पोल फार जुने व गंजलेले असून ते खराब झालेले आहेत. खराब झालेले हे लोखंडी पोल पावसाळी वादळात पडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे गावामध्ये मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे मांगी गावातील विजेचे लोखंडी पोल लवकरात लवकर बदलावेत जेणेकरून भविष्यात होणारा अनर्थ टाळता येईल अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी सुहास बागल, संतोष नरसाळे, अनिल बागल, प्रविण अवचर, वैभव बागल, गणेश नरसाळे, किरण बागल, दीपक नरसाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



