माय मराठी न्युज


एका शेळींने ८ पाय असणाऱ्या पिल्लाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. या शेळीच्या पिल्लाचा जन्म पश्चिम बंगालच्या कालमेघा परिसरातील बनगाव येथे झाला आहे. त्या गावातील सरस्वती मोंडल नावाच्या महिलेच्या शेळीने ८ पायाच्या पिल्लाला जन्म दिला आहे. ही माहिती गावात व आजूबाजूच्या परिसरात वेगाने पसरली असता त्या पिल्ल्याला बघण्यासाठी मोंडल यांच्या घरी एकच गर्दी झाली. सध्या या शेळीच्या पिल्लाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
सविस्तर माहिती अशी की, सरस्वती यांच्या शेळीने दोन पिल्लांना जन्म दिला असून त्यात एक पिल्लू सामान्य आहे तर दुसऱ्या पिल्लाला ८ पाय आहेत. या पिल्लूला बघतातच सरस्वती घाबरल्या कारण त्यांनी ही असे प्रथमच पाहिल्याचे सांगितले. परंतु दुर्देवाने हे ८ पायाचे पिल्लू जन्मा नंतर अवघ्या पाच मिनिटातच मरण पावले परंतु दुसरे पिल्लू सुखरूप असल्याचे सरस्वती यांनी सांगितले. सदर ८ पायाच्या पिल्लाला बघण्यासाठी त्यांच्या घरी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्या पिल्लाचे त्याचे फोटो काढून ते फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.




