‘या’ भारतीय महिला खेळाडूची विक्रमी खेळी; महिला क्रिकेटमध्ये केल्या सर्वाधिक धावा
भारताने राखली प्रतिष्ठा; शेवटच्या सामन्यात इंग्लंडवर चार विकेट्सने मिळवला विजय
माय मराठी न्युज प्रतिनिधी


भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने इंग्लंड विरोधात खेळविण्यात आलेल्या मालिकेमध्ये शेवटच्या सामन्यात नाबाद ७५ धावांची जबरदस्त खेळी करून महिला क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये मितालीने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.
इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या विरोधात खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने इतिहास रचला आहे. ७५ धावांची नाबाद खेळ करणारी मिताली राज ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू बनली आहे. एवढच नाहीतर मिताली राजने सलग तिसरे अर्धशतक लगावत भारतीय महिला क्रिकेट संघाला ४ विकेट्सने विजय मिळवून दिला आहे. ३८ वर्षा च्या मिताली ने आपल्या या खेळीत ११ धावा केल्यानंतर ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनली आहे. मिताली ने इंग्लंडच्या चारलॉट एडवर्डर्स ला मागे टाकलं आहे. चारलॉट एडवर्डर्स च्या नावे १०२२७ धावांचा विक्रम आहे. आपल्या या विक्रमासह मिताली राज क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. याच यादीत इंग्लंडची सुझी बेट्स ७८४९ धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे.
इंग्लंड बरोबर खेळवण्यात आलेल्या या सीरिजमध्ये मिताली राजने उत्कृष्ट खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तीनही सामन्यांमध्ये मिताली राजने अर्धशतक केलं आहे. संपूर्ण मालिकेत मितालीने पहिल्या वन डे मध्ये ७२ धावा केल्या. दुसऱ्या वन डे मध्ये ५९ धावा केल्या तर तिसऱ्या एक दिवशीय सामन्यात नाबाद ७५ धावांची खेळी करून संघाचा क्लीन स्विप होण्यापासून बचाव केला. मिताली राज ने या मालिकेमध्ये सर्वाधिक अर्धशतक आणि सर्वाधिक चौकार लावले आहेत.
मितालीच्या शानदार खेळीमुळे भारताने इंग्लंडला शेवटच्या वन डे सामन्यात ४ गडी राखून पराभूत केले. इंग्लंडने ही मालिका जिंकली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना २२० धावांचे लक्ष्य ठेवले होते, ते भारतीय संघाने ३ चेंडू वाचविताना ६ गडी गमावून पूर्ण केले.




