कोरेगाव भीमा प्रतिनिधी: गजानन गव्हाणे पाटील


गोर, गरीब, सर्वसामान्य जनतेला मोदी सरकार नक्कीच आशा देईल व दिलासा देईल असे वाटत होते,परंतु तसे काही होताना दिसत नाही उलट सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून याचे केंद्र सरकारला काही देणे घेणे नाही. आज पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल बरोबर सर्व स्तरावर महागाई वाढली असून केंद्र सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडत असून केलेल्या वचन पूर्ती कोठेही करताना दिसत नाही. त्यामुळे मोदी सरकारचे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध रस्त्यावर उतरून व्यक्त करीत आहोत.असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप वसंतराव कंद यांनी जाहीर निषेध आंदोलन प्रसंगी व्यक्त करताना सांगितले.
पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल इत्यादीची प्रचंड भाववाढ झाली आहे,सर्वसामान्य जनतेला या महागाईला रोज सामोरे जावे लागत आहे.या महागाईमुळे केंद्र सरकारच्या विरोधात आज हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शिरूर-हवेलीचे आमदार अँड.अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली(ता.हवेली) येथे केसनंद फाटा येथे रस्त्यावर उतरून प्रातिनिधिक स्वरूपात चूल मांडून जाहीर आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी निषेधार्थ महसुलचे अधिकारी यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा वाघोलीचे माजी सरपंच शिवदास उबाळे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रदिप वसंतराव कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेश वारघडे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष योगेश शितोळे, राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा लोचन शिवले, राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा सुरेखा भोरडे, जेष्ठ नेते बाळासाहेब सातव, पंचायत समितीच्या सदस्या संजीवनी कापरे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संतोष गावडे, वाडेबोल्हाईचे सरपंच दिपक गावडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी हवेली तालुका उपाध्यक्ष शोभा हरगुडे, माधुरी वाळके, संध्या भोर, नम्रताताई कांबळे, राजकन्या आव्हाळे, कविता शेडगे, आव्हाळवाडीचे माजी उपसरपंच संदेश आव्हाळे, बळीराम गावडे, मंगेश सातव, गणेश सातव, रसिकांत आव्हाळे, तुळापूर चे माजी सरपंच गणेश पुजारी, युवकचे तालुका उपाध्यक्ष विजय वाळुंज, नवनाथ वागस्कर, पंडीत कोलते, योगेश थोरात, राहुल ठोंबरे, प्रताप सातव, शाम खलसे, साईनाथ वाळके, संतोष मगर, काळुराम ठोंबरे, रुपेश हंडगर, संजय शिंगारे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या आंदोलन प्रसंगी महागाईमुळे केंद्र सरकार विरोधात उपस्थित राष्ट्रवादीचे पदाधिकारी रामभाऊ दाभाडे, प्रदिप वसंत कंद, योगेश शिवले, चंद्रकांत कोलते, लोचन शिवले आदींनी निषेधार्थ भाषणातून आपली मते व्यक्त केली.



