-->
क्रीडादेश

WTC2021: भारतीय संघाची घोषणा; पहा कोण IN कोण OUT

 

न्युझीलँड आणि भारतीय संघामध्ये साऊथॅम्प्टनच्या एजेस बाऊल मैदानावर १८ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासाठी न्युझीलंडनंतर भारतीय संघानेही आपल्या अंतिम १५ खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय आणि किवी संघ दोन हात करताना दिसणार आहेत.

भारतीय संघ हा सामना कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडशी कसोटी विश्वचषक फायनलच्या समांतर सामन्यात होईल. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया मध्ये दोन कसोटी सामने जिंकणारा भारतीय फलंदाज अजिंक्य रहाणे याला या संघात उपकर्णधार म्हणून स्थान देण्यात आले आहे. तर ऋषभ पंतला विकेटकिपर म्हणून स्थान देण्यात आले आहे. तसेच बॅकअप किपर म्हणून ऋध्दिमान साहा ला संघात घेण्यात आले आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे सलामीचे फलंदाज म्हणून खेळाची सुरुवात करतील. तसेच फिरकी गोलंदाज म्हणून म्हणून आर.अश्विन आणि जडेजा हे दोन खेळाडू दिसणार आहेत.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरलेल्या शार्दुल ठाकूरच्या जागेवर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी अनुभवी खेळाडू उमेश यादवला अंतिम १५ जणांच्या भारतीय संघात स्थान देण्यात आलेले आहे.

ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान उमेश यादव, मोहम्मद शमी आणि हनुमा विहारी या तिनही जखमी झालेल्या खेळाडूंचे आयसीसीच्या टीम प्रोटोकॉलनुसार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघात पुनरागमन झाले आहे. शार्दुल ठाकुर व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर शेवटच्या ११ मध्ये असलेले मयांक अगरवाल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही १५ सदस्यीय संघातून वगळण्यात आले आहे. अक्षर पटेलने ही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतुन आपले स्थान गमावले आहे.

भारतीय संघाच्या अंतिम १५ खेळाडूंची नावे

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेट कीपर), ऋद्धीमान साहा (विकेट कीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close