करमाळाप्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत पोथरे येथे पंचायत समिती सदस्य अॅड. राहुल सावंत आणि पोथरेचे सरपंच श्री. धनंजय झिंजाडे यांच्या हस्ते महाआवास – अभियान ग्रामीण योजने अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम पार पडला.
यावेळी लाभार्थी
१) सुशील बाळनाथ जाधव
२) आप्पा लक्ष्मण जाधव
३) संतोष विठ्ठल कांबळे
यांच्या घरकुलाचा ई गृहप्रवेश मान्यवरांसोबत करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी एच एम दरवडेे साहेब, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विठ्ठल भाऊ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य दिपाली ताई जाधव, बबन जाधव, शिवाजी शिंदे, सुभाषराव शिंदे, बाळू जाधव, कैलास जाधव, हमीद शेख, जालिंदर जाधव, बापू उबाळे, सागर सामसे, इतर लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




