-->
गड किल्ले

गडकिल्ले विषयक :- “प्रवास गडकिल्ल्यांचा ध्यास दुर्ग संवर्धनाचा “

हरिहर (Harihar)

हरिहर ला त्रंबक रांगेतील मुख्य किल्ला आहे.
कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि इंग्रजी ‘C” आकाराचा मार्ग हे या किल्ल्याचे मुख्य आकर्षण आहे. निरगुडपाडा हे हरिहर चे पायथ्याचे गाव आहे. पायथ्यावरून हरिहर आपल्याला आयताकृती भासतो.

चढाई सुरू केल्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत आपण कोणत्याही मार्गाने गेलो तरी किल्ल्याच्या कातळ भिंती पाशी येऊन पोहोचतो.
कातळ भिंती जवळ पोहोचल्यावर हरिहर च्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचे दर्शन घडते.
जवळपास 90 डिग्री च्या कोनात त्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. जागोजागी आधाराला खोबण्या देखील आहेत.जर पाऊस आणि जोराचा वारा असेल तर या हरिहर च्या पायऱ्या चढताना चा रोमांच काही औरच असतो.
पायऱ्या चढून गेल्यावर किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो.
दरवाजपासून पुढे एका बाजूला दरी असलेला इंग्रजी “C” आकाराचा मार्ग आहे. तिथून पुढे गेल्यावर पुन्हा पायऱ्या लागतात. पुढे कातळाच्या आतील भागात कोरलेल्या पायऱ्या आहेत. त्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजा जवळ पोहोचतो.
आता आपण किल्ल्याच्या पठारावर असतो.
गडाच्या माथ्याकडे जात असताना दोन्ही बाजूला आपल्याला वाड्यांचे व वास्तूंचे अवशेष बघायला मिळतात.
गडमाथ्याकडे जात असताना डावीकडे खाली उतरल्यास आपल्याला हरिहर चा चोर दरवाजा दिसतो.
अंदाजे ४० फूट खोल आयताकृती खोली त्यातून एक खिडकीतून बाहेर पडणारा मार्ग पुढे कातळात खोदलेल्या रस्ता व पायऱ्या सर्पिलाकार मार्गाने खाली दरीतून जंगलात उतरतात. आज खाली पर्यंत पायऱ्या अस्तित्वात नाहीत. तेथून पुढे गेल्यावर काही पाण्याची टाकी शेजारीच हनुमानाचे मंदिर व त्या शेजारी बांधीव तलाव आहे.
एका बाजूला भिंत बांधून पाणी अडवून तलाव निर्माण केला आहे.
तेथून पुढे गेल्यावर आपण किल्ल्याच्या शेवटच्या टोकाकडे पोहोचतो
तेथे आणखी काही पाण्याच्या टाक्या आणि एक इमारत आहे.
तेथून परत येताना डावीकडे किल्ल्याच्या सर्वात उंच भाग आहे. त्यावर एक ध्वज लावलेला आहे. त्या उंचट्यावरून आपल्याला हरिहर चे संपूर्ण दर्शन घडते.
गडमाथा फार विस्तीर्ण नाही.

सूचना :- गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची बारमाही टाकी आहेत.
गडावरील इमारतीत 10 -12 जणांची राहण्याची व्यवस्था होऊ

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close