-->
करमाळागड किल्लेसामाजिक

हरिहर गडावर काही समाजकंटकांकडून शिवभक्तांना मारहाण

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

गड पाहण्यासाठी व दुर्गभ्रमंती साठी गेलेल्या कोल्हापूर येथील दोन शिवभक्तांना दारू पिऊन नशा करणाऱ्या काही परप्रांतीय समाजकंटकांकडून मारहाण झाल्याची संतापजनक घटना आज सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडावर घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर येथील दोन शिवभक्त नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडावरती दुर्गभ्रमंती साठी गेले होते. त्यांना गडावर काही परप्रांतीय समाजकंटक दारू पीत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी गडावर येऊन दारू का पिता.? असे विचारले असता त्यांनी उलट शिवभक्तांना शिवीगाळ करून जबर मारहाण केली आहे. यामध्ये दोन्हीं शिवभक्त गंभीर जखमी झाले असून एकाचा पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला आहे. तर दुसऱ्याचा हात फॅक्चर झालेला आहे.

शिवराज मगदुल (वय २२ वर्षे) व पृथ्वीराज गायकवाड (वय २३ वर्षे) अशी जखमी झालेल्या दोन्ही शिवभक्तांची नावे असून दोघेही कोडोली जि. कोल्हापूर येथील रहिवाशी आहेत. त्यांना उपचारासाठी त्रंबक रोड, नाशिक येथील धारिवाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close