
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे मा. श्री मनोज राऊत साहेब (गट विकास अधिकारी पं.स. करमाळा) यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव वृक्षारोपण व व्याख्यानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपज्वलन करून करण्यात आली. अनावश्यक प्रथा व परंपरेला फाटा देत शिवचरित्रपर विद्यार्थ्यांची भाषणे, गीते तसेच व्याख्यानाने शिवजयंती साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने मा.श्री. मनोज राऊत साहेब यांनी शिवचरित्र पर आपले विचार मांडले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे एक विचार होते आणि ते त्यांच्या कार्यातून अजुन ही आपल्यात सामावले आहेत. प्रत्येकाने आपल्या कार्यात त्यांचा एक विचार म्हणून काम करावे. आपण आपल्या कार्यातील छत्रपती शिवाजी व्हावे.
यावेळी रविदादा वळेकर यांनी कार्यक्रमा विषयी मार्गदर्शन केले व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आपले विचार व्यक्त केले. राजे हे सर्व जाती धर्मातील बहुजनांना एकत्र करून काम करत होते. त्यांनी सबंध बहुजनांच्या सहकार्यातून स्वराज्य स्थापन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते रविदादा वळेकर यांनी आभार शशिकांत वाघमारे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.श्री. दिलीप मुळे यांनी केले.
या उत्सवामध्ये शाम गुरव यांनी आरद गायली. तसेच वैष्णवी लहू फरतडे, तनुजा रविंद्र राऊत, गौरी शरद फरतडे, वैष्णवी किरण नलवडे, पूजा लहू फरतडे, साक्षी दिलीप जगताप आदी विद्यार्थ्यांनी गीते व भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व्यक्त केले.
यावेळी रविदादा वळेकर, तात्यासाहेब वळेकर (उपसरपंच), संतोष महाराज, केरबा पन्हाळकर (पोलिस पाटील), साहेबराव वळेकर, कैलास काकडे, तात्यासाहेब पाटील, किसन वाघमारे, शशिकांत वाघमारे, प्रदीप गाडे व ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप मुळे, धनंजय वाघमारे, ज्ञानेश्वर वळेकर, महेश वाघमारे, नाथाभाऊ शिंदे, रविंद्र राऊत, मारुती कांबळे आदींनी परिश्रम घेतले.



