-->
राजकियराज्यविशेष

‘या’ कारणासाठी रयतक्रांतीचे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फटके देत हटके आंदोलन

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

रयतक्रांती संघटनेने आज दुधाचे दर कमी झाल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी आंदोलन केले. रयतक्रांती संघटना करमाळा तालुक्याच्या वतीनेही आज करमाळा तालुक्यातील मांगी येथे राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चाबूकाचे फटके देत आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलताना राज्य कार्यकारिणी सदस्य अजय बागल म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे बहुतांश शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. परंतु आत्ता दुधाचे दर ही कमी होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. जनावरांसाठी लागणाऱ्या खुरकाचे दर वाढत असताना दुधाचे दर मात्र दिवसेंदिवस कमी होत आहेत. गायीच्या दुधाला ३० रु प्रती लिटर व म्हसीच्या दुधाला ६० रु प्रती लिटर दर देण्यात यावा. या मागणीसाठी आज आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अजय बागल, करमाळा तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे, वडगाव चे मा.ग्रा.सदस्य जावेद पठाण, तालुका संघटक महावीर नरसाळे, ओबीसीसेलचे तालुकाध्यक्ष प्रताप क्षिरसागर, अभिजीत बागल, महादेव सुरवसे, शैलेश शेगडे व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close