
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील डिकसळ ते कोंढार चिंचोली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाच्या कामावरून पुन्हा एकदा श्रेयवाद रंगू लागला असून, यावर कोर्टी जिल्हा परिषद सदस्या सौ. वनिता सुभाष गुळवे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या की, या पुलासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून तब्बल ५५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. त्यामुळे या पुलाचे खरे श्रेय संजयमामांनाच जाते, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
वहीवाटीचा रस्ता खुला करण्याचा तहसीलदारांचा आदेश, तरी तक्रारदार असमाधानी; आत्मदहनाचा इशारा कायम
बारामती अग्रोचे उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष (आबा) गुळवे यांनीही प्रत्यक्ष स्थळ पाहणीदरम्यान हे काम माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्याचे सांगितले होते. मात्र यानंतर पाटील गटाच्या प्रवक्त्यांकडून श्रेयवादाचे राजकारण सुरू करण्यात आल्याचा आरोप वनिताताईंनी केला.
त्या पुढे म्हणाल्या की, निधी मंजूर झाल्यानंतर काही काळ अजितदादा सरकारबाहेर राहिले होते. त्याच काळात काहींनी कंत्राटदारांवर दबाव टाकून हे काम प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केला. याचा सर्व हिशोब जनतेला माहिती असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्याचे आमदार आणि त्यांच्या गटाने गेल्या दोन वर्षांत किती विकासकामे मंजूर करून आणली, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा. तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात किती कोट्यवधींची कामे मंजूर केली, हेही जनतेला सांगावे,” असे आव्हान वनिताताईंनी दिले.
तालुक्यातील विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा करण्याऐवजी अनेक विकासात्मक प्रश्नांकडे पाटील गटाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. जनता नेत्यांच्या कामाचा न्याय विकासाच्या तराजूत करत असते आणि त्या तुलनेत संजयमामा शिंदे हेच वजनदार ठरतील, असेही त्या म्हणाल्या.
“आदिनाथ वाचवणार की विकणार ? सत्ताधाऱ्यांनी अगोदर हे स्पष्ट करावं !” – ॲड. अजित विघ्ने
डिकसळ-कोंढार चिंचोली हा पूल परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, हे काम लवकर पूर्ण व्हावे अशी जनतेची अपेक्षा आहे. या पुलाच्या कामासाठी बारामती अग्रोनेही वेळोवेळी सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हे काम सुरळीत आणि वेगाने सुरू राहावे यासाठी प्रशासनालाही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम होणे गरजेचे असून, माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आणलेल्या अनेक विकासकामांचे परिणाम आता प्रत्यक्ष दिसू लागल्याचे वनिताताईंनी यावेळी सांगितले.



