-->
आरोग्यमहिलाविषयक

प्राथमिक आरोग्य केंद्र सोमठाणे येथे आठवा राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी | सिन्नर (माय मराठी न्यूज)

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सिन्नर-२, वडांगळी विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र सोमठाणे आणि रयत शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी आठवा राष्ट्रीय पोषण महा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे उद्घाटन सोमठाणे ग्रामपंचायत सरपंच श्री. भारत कोकाटे यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय कानवडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजस्विनी बसते, तसेच रयत शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. महिला पोलीस पाटील यांनी विशेष हजेरी लावली.


आकर्षक उपक्रम:-

  • पोषण मटका व पाककृती स्टॉल्स : वडांगळी बीटच्या अंगणवाडी सेविकांनी पौष्टिक पदार्थांचे स्टॉल लावून माहिती दिली.
  • आरोग्य मार्गदर्शन : डॉ. बसते यांनी स्वच्छता व संतुलित आहाराबाबत मार्गदर्शन केले.
  • स्वच्छता गीत : शाळेतील किशोरी मुलींनी स्वच्छता संदेश देणारे गीत सादर केले.
  • विशेष सन्मान : गरोदर मातांचा कौतुक सोहळा, अन्नप्राशन विधी आणि बेबी-केअर किटचे वाटप करण्यात आले.

पर्यवेक्षिका सविता होलगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी शिक्षिका संजीवनी चव्हाणके, प्रतिभा कोकाटे, संजीवनी कोकाटे, सुनीता कोकाटे, श्यामल भालेराव, तसेच मदतनीस मंदा साळवे, स्वाती गांगुर्डे, ज्योती पवार, राधिका ढेंबरे, ज्योती गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

 

सरपंच श्री. कोकाटे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारी वर्ग, आशा स्वयंसेविका व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close