-->
करमाळाकृषी विषयकमाहिती विषयक

ALERT! करमाळा तालुक्यात मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाकडून सतर्कतेचे आदेश

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तहसील कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार दि. २७/०९/२०२५ ते २८/०९/२०२५ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील सद्यस्थितीमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम यांनी केले आहे.

 

करमाळा तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार, स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी नाल्यांजवळ, ओढ्यांजवळ तसेच पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी अनावश्यक गर्दी न करता आपत्तीच्या प्रसंगी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

 

पूर परिस्थितीतील संभाव्य नुकसानीपासून बचावासाठी गावकऱ्यांनी खबरदारी घ्यावी आणि तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close