-->
राज्यविशेष

Breaking: ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे हृदविकाराच्या झटक्याने निधन

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

‘अनाथांची माई’ म्हणून ओळख असलेल्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिंधुताई सपकाळ यांना महिन्याभरापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

 

सिंधूताई सपकाळ यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून जानेवारी २०२१ मध्ये सिंधूताईंना केंद्र सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आणि मध्यंतरी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांना अनाथांची माई म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close