दुधाला दरवाढ न दिल्यास दुग्धविकास मंत्र्याला जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही; युवा सेनेचा ईशारा

माय मराठी न्यूज


शिवसेना व युवा सेना सचिव वरूण सरदेसाई, युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखी व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू भैय्या पराडे पाटील व बाभुळगावचे सरपंच भूषण भैय्या पराडे पाटील यांच्या उपस्थितीत दूध दर वाढीसाठी बाभुळगाव येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी गाईच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीचे दुधाला ७५ रुपये दर द्यावा. अन्यथा दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही. असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला.
महाराष्ट्रातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच पशुपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. दुध खरेदी बाबत शासनाचे कोणतेही धोरण नसल्याने खाजगी दुध खरेदी करणार्या संस्था शेतकऱ्यांना लूटत आहेत. अशा संस्थांवर शासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याची कमतरता, पशुखाद्याचे गगनाला भिडलेले दर पाहता दुध उत्पादन खर्च वाढला असल्याने गायीच्या दुधाला ४० रुपये तर म्हशीचे दुधाला ७५ रुपये प्रतिलीटर दर द्यावा. वरचेवर दुध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढूनही, सरकारच्या नाकर्तेपणामुळे व दुध दराबाबत ठोस निर्णय न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरा मलिदा मात्र दुध खरेदीदारच खात आहेत. सध्याच्या सरकारने शेती व्यवसाय अडचणीत आणला आहे. सत्तेत आल्यापासून शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. दूध दरवाढ केली नाही तर सरकारला येणाऱ्या काळात याची खुप मोठी किंमत मोजावी लागेल. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मागणी नुसार तात्काळ दुध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात तुम्हाला सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा ईशारा सोलापूर जिल्हा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर, युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके, चंद्रकांत पराडे, बबलु पाटील, अविनाश पराडे, सागर साळुंखे, अशोक पराडे, सुनील पराडे, संग्राम पराडे, गणेश गोडसे, संतोष पराडे, गणेश पराडे, अक्षय पराडे, धनाजी सुरवसे, गणेश चव्हाण, आबा साठे, दादासो गोडसे, समाधान पराडे, सिताराम पराडे, राजाभाऊ पराडे, दयानद इंगळे, गणेश काळे, लालासाहेब भोई, प्रतिक इंगळे, प्रथमेश भोई, आबा कुंभार यांच्यासह शेतकरी व युवासैनिक उपस्थित होते.
शासनाने ३.५ फॅटला ३४ रुपये दर ठरवून दिला आहे. पण प्रत्येक जिल्ह्यातील दूध संघाचे दर वेगवेगळे आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ३३ रुपये, सातारा पुणे जिल्ह्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्ह्यात २६ रुपये शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळत आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून शासन याकडे लक्ष नाही देत नाही. गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ७५ रुपये दर द्यावा. अन्यथा दुग्धविकास मंत्र्याला सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही.
गणेश इंगळे, युवा सेना जिल्हाप्रमुख



