-->
सामाजिक

फुले-शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोसिएशन सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सोमनाथ खंडागळे यांची निवड

 

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)

 

फुले-शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ) या राज्यस्तरीय, शासकीय नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पत्रकार सोमनाथ खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे. शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हिंगोले (मुंबई) यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्तीपत्र जारी झाले.

 

महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या खंडागळे यांचे नाव राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी सुचविले होते. मुख्यालय भिवंडी (मुंबई) येथून अधिकृत पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीची माहिती प्राप्त झाली.

 

फुले-शाहू चॅरिटेबल व वेल्फेअर फाऊंडेशन हे आरोग्य सेवा, अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कृत्रिम अवयव, बेरोजगार तरुणांना रोजगार संधी, विधवा व तृतीयपंथी महिलांना भांडवल सहाय्य, गरीब शेतकऱ्यांना कृषी साहित्य, चालकांना वाहन खरेदीसाठी मदत, तसेच शासन अनुदानित क्रीडा प्रशिक्षण अशा विविध सामाजिक सेवांसाठी ओळखले जाते.

 

नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सोमनाथ खंडागळे म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत संस्थेच्या योजनांचा लाभ पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न असतील.”त्यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघ, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close