अभिजीत पाटील यांची पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत इन्फोर्समेंट ॲाफिसर पदी निवड

अकलूज/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


अभिजीत आशा हेमंत पाटील यांचे मुळ गाव माढा तालुक्यातील लव्हे परंतु वडील प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्यामुळे अकलुज येथे १९९२ पासून स्थायिक झालेले कुटुंब अभिजीत यांचे प्राथमिक शिक्षण इयत्ता दहावी पर्यंत सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे त्याचबरोबर इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल धवलनगर येथे आणि नंतर बीएससी (ऍग्री) कृषी महाविद्यालय पुणे येथे पूर्ण झाले. परंतु अभिजीत ने जिद्द बांधली होती ती यूपीएससी मधून क्लास १ अधिकारी होण्याची, बीएससी ॲग्रीच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कोरोना काळात देखील तो यूपीएससीच्या तयारी करता दिल्ली येथे राहण्यास गेला. त्याने मागील २-३ वर्षात तीन परीक्षांमध्ये यश संपादन केले. सध्या तो दिल्ली येथे ट्रेनिंग घेत असताना काल अचानक निकाल लागला आणि यूपीएससी कडुन घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षामधून देशात ३७ वा रँक मिळाला आणि एनफोर्समेंट ऑफिसर म्हणून निवड झाली.
लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड असल्याने शालेय जीवनात सर्व स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण करत गेला आणि आज दिल्ली येथे केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंमलबजावणी अधिकारी पदी काम करण्याची संधी या परीक्षेद्वारे त्याला मिळाली आहे. या मिळालेल्या यशामध्ये आजोबा कै. डी. बी. पाटील साहेब, कै. सुरेश माणिकराव पाटील, कै. चंद्रकांत माणिकराव पाटील, कै. डॉ. कल्याणराव पाटील यांचे आशीर्वाद लाभले तसेच वडील प्रा. हेमंत पाटील व आई सौ. आशा पाटील यांच्या पुण्याईमुळे हे यश त्याला संपादन करता आले. जिल्हा बॅंकेचे अधिकारी श्री. जयंत पाटील साहेब यांचे अभिजीतला मोलाचे मार्गदर्शन झाले तसेच सर्व शिक्षक वर्गाचे व वडीलधारी व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
पडसाळी गावचे विद्यमान सरपंच तथा भाजपाचे माढा तालुकाध्यक्ष श्री. योगेश पाटील तसेच सचिन पाटील, संदीप पाटील, संदेश पाटील यांचा तो भाच्चा आहे, त्यांचे देखील अभिजितला मोलाचे मार्गदर्शन मिळाले. लहू येथील विनायक पाटील पत्रकार, उमेश पाटील, महादेव पाटील, मेजर हरिश्चंद्र पाटील व गावातील सर्व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. अभिजीतचे कौतुक संस्थेचे मार्गदर्शक श्री. जयसिंह मोहिते- पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. संग्रामसिंह मोहिते- पाटील, संस्थेच्या संचालिका कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव श्री. अभिजीत रणवरे साहेब, सहसचिव हर्षवर्धन खराडे- पाटील व सर्व शिक्षक वर्गाने केले.
यावेळी बोलताना अभिजीत याने सांगितले की, आपण आपले ध्येय निश्चित करून आयुष्यात वाटचाल करावी. ध्येयपूर्तीसाठी अथक परिश्रम घेतले पाहिजेत माझं ध्येय जिल्हाधिकारी होण्याचं आहे ते मी लवकरच पूर्ण करणार आहे. मला माझे आजी- आजोबा तसेच आई- वडील यांचे आशीर्वाद सोबत आहेत आणि सर्व थोरामोठ्यांची साथ आहे.




