-->
करमाळाविशेष

मांगी शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन; परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या महिन्यापासून मांगी परिसरात बिबट्याचा वावर, वनविभागाने आज पर्यंत काय केले? नागरिकांचा संतप्त सवाल

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील वडगाव उत्तर येथील शेतकरी शरद शिंदे यांच्या शेतात गुरुवार दि. १६ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता बिबट्याचे दर्शन झाले असून त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग एका ऊस तोडणी कामगाराच्या अकरा वर्षाच्या मुलाने केले आहे. यामुळे मांगीसह वडगाव दक्षिण, वडगाव उत्तर, पूनवर, पोथरे, रावगाव, जातेगाव, हिवरवाडी, भोसे या गावातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या एक महिन्यापासून मांगी परिसरात बिबट्याचा वावर असूनही वन विभागाकडून मात्र कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा ????????????????https://youtube.com/shorts/CGpKd6EfyNE?feature=share

मांगी परिसरात एक महिन्यापासून बिबट्या वास्तव्यास असून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या व लहान वासरे बिबट्याने फस्त केल्याच्या चर्चा शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळत असतानाच आज सात वाजेच्या सुमारास ऊस तोडणी कामगाराचा मुलगा शौचासाठी बाजूच्या शेतात जात असताना अचानक त्याला साधारण पन्नास फूट अंतरावरून बिबट्या जात असल्याचे दिसताच त्याने यावेळी बिबट्याचे व्हिडिओ शूटिंग केले. बिबट्या दूर गेल्यानंतर त्यांनी मांगी गावात येऊन ही माहिती मांगीचे सोसायटी चेअरमन सुजित बागल यांना दिली. यानंतर बागल यांनी तात्काळ वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बाबतची माहिती त्यांना दिली.

गेल्या डिसेंबर महिन्यात मांगी येथील किसन शिंदे यांच्या वस्तीवरील म्हशीचे वासरू तर हिवरवाडी येथील पांडुरंग खोमणे यांच्या वस्तीवर असलेल्या गोठ्यातील गाईचे वासरू बिबट्याने खाल्ले होते.

तीन वर्षांपूर्वी असाच एक बिबट्या करमाळा तालुक्यात आला होता. त्याने करमाळ्यातील तीन निष्पाप लोकांचे प्राण घेतले होते. त्याप्रमाणेच आता करमाळ्यात फिरत असलेला बिबट्या नरभक्षक होण्याची वाट वनाधिकारी पाहत आहेत का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

गेल्या एक महिनाभरापासून बिबट्या मांगी शिवारात वास्तव्यास असून आज त्याचे दर्शन शरद शिंदे यांच्या शेतात ऊस तोड मजुराच्या मुलास झाले आहे. मात्र, आमची दखल वन अधिकारी घेत नाहीत. या पुढील काळात बिबट्याने कोणाचा जीव घेतला तर याला सर्वस्वी वन अधिकारी जबाबदार राहतील.

सुजित बागल, मांगी ग्रामस्थ.

 

मांगी शिवारात बिबट्या वास्तव्यास असताना सुद्धा वनाधिकारी एक महिन्यापासून शांत झोपले आहेत. आज दीपक कचरू ठाकरे या अकरा वर्षाच्या मुलानी व्हिडिओ रेकॉर्डिंग करून बिबट्याचे लाईव्ह लोकेशन दाखवले आहे. तरीसुद्धा वन अधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत. ते जबाबदारी टाळून करमाळा तालुक्यात बिबट्या नाही असा दावा करत आहेत. त्यामुळे अधिकार्‍यांना बदलून नवीन कार्यक्षम वनाधिकारी करमाळ्याला द्यावेत.
महेशचिवटे,शिवसेनाजिल्हाप्रमुख.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close