-->
करमाळाराजकिय

गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्याची सदस्य नोंदणी जिल्ह्यात एक नंबर होईल- चेतनसिंह केदार

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा विधानसभा सदस्य नोंदणी मध्ये जिल्ह्यात एक नंबर राहील असे प्रतिपादन भाजपा (प) चे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियानाची बैठक करमाळा येथील केमिस्ट भवन येथे चेतनसिंह केदार यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना केदार म्हणाले की, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे व त्यांची टीम ही गेली अनेक वर्षापासून भाजपचे काम करीत आहे. त्यांनी करमाळा तालुक्यात भारतीय जनता पार्टी घराघरापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी होईल असा मला विश्वास आहे.

 

यावेळी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात आपण एक नंबरची सदस्य नोंदणी करण्यासाठी खुणगाठ बांधावी व सर्वांनी जोमाने जास्तीत जास्त नोंदणी करावी. यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून येणाऱ्या काळात आपण जास्तीत जास्त नोंदणी करावी. आगामी काळात आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून जास्तीत जास्त भाजपाचे सदस्य करावेत असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीमध्ये तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, विजयकुमार नागवडे, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भगवानगिरी गोसावी यांनी केले तर आभार शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी मानले.

 

या बैठकीसाठी जिल्हा उपाध्यक्ष अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, बंडूशेठ शिंदे, आजिनाथ सुरवसे, संतोष कुलकर्णी, अशोक ढेरे, गणेश तळेकर, लक्ष्मण शेंडगे, पत्रकार दिनेश मडके, हर्षद गाडे, धर्मराज नाळे, भैयाराज गोसावी, मच्छिंद्र हाके, जयसिंग भोगे, दादासाहेब देवकर, नितीन निकम, रणजीत पवार, विष्णू रणदिवे, सुनील जाधव, संदीप काळे, प्रकाश ननवरे, किरण बागल, सयाजी जाधव, अमोल जरांडे, ईश्वर मोरे, गणेश माने, राजू सय्यद, सागर सूर्यवंशी, महिला आघाडीच्या पूजाताई माने, राजश्री खाडे, चंपावती कांबळे, रणजीत निंबाळकर, समाधान कांबळे, हनुमंत रणदिवे, गणेश परदेशी, किरण शिंदे, बापू मोहोळकर, सचिन कानगुडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close