-->
करमाळाविशेष

टीव्ही९ चे पत्रकार शितलकुमार मोटे यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’; कारगिल विजय दिनी होणार गौरव

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून टीव्ही ९ मराठीचे धडाडीचे पत्रकार शितलकुमार मोटे यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाला आहे. आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा आणि यश कल्याणी सेवाभावी संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि. २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

या सोहळ्यास प्रा. गणेश करे-पाटील (संस्थापक-अध्यक्ष, यश कल्याणी सेवाभावी संस्था, पुणे), श्रीमती शिल्पाताई ठोकडे (तहसीलदार, करमाळा), रणजित माने (पोलीस निरीक्षक, करमाळा), ॲड. बाबुराव हिरडे (अध्यक्ष, ग्रामसुधार समिती, करमाळा), डी. ई. पवार (सार्वजनिक बांधकाम विभाग, करमाळा), विवेक येवले (स्वातंत्र्य सैनिक परिवार तथा पत्रकार), प्रा. कल्याणराव साळुंके (यश कल्याणी नेचर कॉन्झर्वेशन, करमाळा), भारत (भाऊ) शिंदे (विश्वस्त, श्री स्वामी समर्थ देवस्थान, अक्कलकोट), रेवणनाथ भिसले (सहाय्यक कामगार आयुक्त, अहिल्यानगर), बाळकृष्ण लावंड सर (अध्यक्ष, सोलापूर जिल्हा इंग्रजी लँग्वेज असोसिएशन) तसेच अक्रूर शंकरराव शिंदे (अध्यक्ष, आजी-माजी सैनिक कल्याणकारी मंडळ, करमाळा) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि समाजहिताचा ध्यास घेऊन केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शितलकुमार मोटे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल करमाळा तालुक्यासह पत्रकार वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. तसेच कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने होणारा हा सन्मान पत्रकारितेतील प्रामाणिक कार्याला मिळालेली एक मोठी पोच पावती मानली जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close