अकलूज फार्मसी कॉलेजमध्ये स्वच्छता शिबिर संपन्न

प्रतिनिधी/अकलूज (माय मराठी न्यूज)


शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज येथे दि. १७ सप्टेंबर २०२४ ते २ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत अभियानाची शपथ देण्यात आली. तसेच महाविद्यालय परिसर स्वच्छ करणे, वृक्षारोपण करणे यासारखे विविध उपक्रम राबवण्यात आले. मोहिमेचा समारोप राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करून करण्यात आला.
या दिवशी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अकलूज येथील जुना बस स्थानक परिसरात स्वच्छता केली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे, डॉ. मुकूंद गाडे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. बापुराव अंकलगी, प्रा. महेश मिटकल, प्रा. प्रविण दुपडे, प्रा. प्रशाली शिंदे, प्रा. शुभांगी खरात उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुषमा शिंदे, गिरिजा साळुंखे, समाधान दुरापे, किशोर हुलगे यांनी परिश्रम घेतले.




