-->
करमाळाकृषी विषयक

पाणलोट प्रकल्पामुळे तरटगाव होणार पाणीदार; परदेशी अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची पाहणी

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

तरटगाव हे करमाळा तालक्यातील सीना नदीच्या काठावरील एक ७०० लोकसंख्या असलेले छोटेसे गाव आहे. या गावात अनेक वर्षापासून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. डिसेंबर महिन्यापासूनच गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. या बिकट परिस्थितीचा सामना कसा करायचा? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला होता. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावकऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि यातूनच गावकऱ्यांनी पाणलोट प्रकल्पाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील तरटगाव (ता. करमाळा) येथील पाणलोट प्रकल्पाच्या कामाची पाहणी सेफ वॉटर नेटवर्कचे सीईओ क्रिस विल्यम्स यांच्यासह इतर अधिकाऱ्यांकडून शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी करण्यात आली.

गावातील गावकऱ्यांनी सेफ वॉटर नेटवर्क इंडिया या संस्थेच्या मदतीने राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्याकडे पाणलोट विकास प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केला. गावकऱ्यांच्या व संस्थेच्या प्रयत्नामुळे नाबार्डने प्रथम गावामध्ये भेट देऊन गावाच्या परिस्थितीचा अभ्यास करून प्रथम चरणातील प्रकल्पाला मंजुरी दिली. एका वर्षामध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम हा प्रकल्प क्षमता बांधणी टप्पा पूर्ण करण्यात आलेला असून प्रकल्पाचे योग्य नियोजन करण्यासाठी गावात एक पाणलोट समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. जलक्रांती पाणलोट विकास समिती तरटगाव ता. करमाळा जि. सोलापूर असे या समितीला नाव देण्यात आले असून समितीच्या देखरेखीखाली व सेफ वॉटर नेटवर्क इंडिया या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मागील एक वर्षापासून तरटगाव मध्ये पाणलोट प्रकल्प, जल व मृदा संधारणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

 

या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रथम टप्प्यामध्ये १०० हेक्टर क्षेत्रावर कामे करण्यात आली आहेत. यामध्ये सलग समतर चर (CCT), शेताला बांध बंदिस्ती (Farm Bund), पाणी शोषणारे खड्डे (WAT), रिचार्ज बिट्स (Recharge Pits) छोट्या ओघळीवर दगडी बांध (Loose Boulder structure) या प्रकारची कामे करण्यात आली आहेत आणि पुढील टप्प्यात ९०० हेक्टर क्षेत्रावर कामे करण्यात येणार आहेत. १०० हेक्टर वर झालेल्या कामाचा फायदा आज त्या भागातील शेतकऱ्यांना जाणवत आहे. त्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढली आहे.

 

यावेळी क्रिस विलम्स (सेफ वॉटर नेटवर्कचे सीईओ न्यूयॉर्क), चार्ल्स निमको घाना देश्याचे डायरेक्टर अफ्रिका) डॉ. शेरॉन ओकुबो (सुपर मॉडेल आणि समाज सेविका) रविंद्र सेवक (भारताचे डायरेक्टर) व सौ. पुनम सेवक (व्हॉइस प्रेसिडेंट) संभाजी पालवे (हेड जलसंधारण) श्याम शिरसाट (प्रकल्प सम्वयक) जलक्रांती पाणलोट विकास समिती व रायगड शेतकरी गटाचे सदस्य, पोटेगाव येथील अन्नपूर्णा महिला शेतकरी गट तसेच तरटगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पाणलोट प्रकल्पामुळे तरटगाव येथील शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. डिसेंबर महिन्यातच कोरड्या पडणाऱ्या विहिरींमध्ये आत्ता पाऊस झाल्यानंतर अवघ्या १५ ते २० दिवसात पाणी वाढू लागते. पडलेल्या पावसाचे पाणी जाग्यावरच मुरल्यामुळे पाणी पातळीमध्ये भरपूर वाढ झालेली आहे. यामुळे आमच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच शेती पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.

श्री. रविंद्र जाधव, शेतकरी, तरटगाव

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close