-->
विशेषसामाजिक

आ. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी मसदपूर येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

कर्जत/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

कर्जत जामखेड चे आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था यांच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी लोणी मसदपूर (ता. कर्जत) येथील विद्यार्थ्यांना गावातील महिला व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत कंपास पेटीकार्टून पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

 

याप्रसंगी लोणी मसदपूर येथील अंगणवाडीतील सर्व २४ लहान मुलांना कंपास पेटी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व ७९ विद्यार्थ्यांना कंपास पेटी व इयत्ता तिसरी ते इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांना ५१ कार्टून पुस्तके तसेच नूतन माध्यमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना २६३ कंपास पेटी व इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना २० कार्टून पुस्तकाचे वाटप गावातील महिला व स्थानिक पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी वैशाली निंबाळकर, अनुराधा निंबाळकर, अलका निंबाळकर, बेबी शेख, सुनिता कटारे, लता चव्हाण, संगीता ससाने, कोमल कांबळे, संध्याराणी यादव, लता यादव, बेबी कटारे, मंगल अडागळे, लता कटारे, सुरेखा कटारे, शितल पवार, मनीषा गरड, अंगणवाडी सेविका नीता होले, आशासेविका सुरेखा कोकाटे यांच्यासह अनिल कटारे, भैया गरड, बाळासो गरड, भैय्या कटारे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

आमदार रोहितदादा पवार यांच्या रूपाने कर्जत तालुक्याला विकासाची दूरदृष्टी असलेला आमदार मिळाला असून त्यांच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत. यापुढेही शालेय विद्यार्थ्यांना गरजेनुसार रोहितदादांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

सौ. वैशाली सुनील निंबाळकर, सामाजिक कार्यकर्त्या, लोणी मसदपुर

 

आमदार रोहितदादा पवार यांच्या सहकार्याने आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या अगोदरही मोफत सायकल, परीक्षा पॅड, ग्रंथालयासाठी पुस्तके, क्रीडा साहित्य व वॉटर प्यूरिफायर फिल्टर व आत्ता कंपास पेटी व कार्टून पुस्तके मिळाली आहेत. आमदार रोहितदादा हे महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एकमेव आमदार आहेत जे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या गरजा जाणून न मागता पूर्ण करतात. विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

श्री. काकडे सर, मुख्याध्यापक, नूतन माध्यमिक विद्यालय, लोणी मसदपूर

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close