उद्योगमहर्षि कै. उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप

अकलूज/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)


ग्रामीण भागात उद्योगांना प्रोत्साहन देऊन नवनवीन व्यवसायातून युवकांना प्रोत्साहन देणार्या तसेच समाजसेवेत अनमोल योगदान देणार्या उद्योगमहर्षि कै. उदयसिंह मोहिते पाटील यांच्या ६४ व्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप कार्यक्रमासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून अभिवादन करण्यात आले.
श्री क्षेत्र आनंदी गणेश येथील कै. उदयसिंह मोहिते-पाटील यांच्या शक्तीस्थळास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत मोहिते-पाटील परिवार व विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरीकांनी अभिवादन केले. या कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, शिवशंकर बझारच्या चेअरमन डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते- पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी पं.स.सदस्य अर्जुनसिंह मोहिते- पाटील, शिवरत्न उद्योग समुहाचे चेअरमन किर्तीध्वजसिंह मोहिते- पाटील, बझारच्या माजी अध्यक्षा ईश्वरीदेवी मोहिते-पाटील, सहकार महर्षी कारखान्याच्या संचालिका स्वरूपाराणी मोहिते पाटील, माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील, किशोरसिंह माने पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व नागरीक उपस्थित होते.
यावेळी श्री क्षेत्र आनंदी गणेश सेवाभावी संस्थेच्या वतीने आनंदनगर परिसरातील गरजू विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करण्यात आले तसेच श्रीक्षेत्र आनंदी गणेश परिसरात १५० वृक्षांची लागवड करण्यात आली. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अकलूज- माळेवाडी परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकिर्ती युवा मंचच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले. यामध्ये २२०० विद्यार्थी-विद्यार्थीनी व शिक्षकांचा सहभाग होता.




