प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी आवाहन

माय मराठी न्यूज नेटवर्क


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तसेच भारतीय दलित संसद संघाच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर यश प्राप्त केले आहे अशा खेळाडूंना व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी राष्ट्रीय खेळाडू व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपले प्रस्ताव लवकर पाठवावेत. असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी केले आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे हे चौथे वर्ष असून लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय खेळाडू व सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या ४ व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरी इच्छुकांनी आपले प्रस्ताव ३० जुलै पर्यंत ‘बिग बी आय टी पॉईंट’ नवीन एसटी स्टँड समोर, बजाज फायनान्स शेजारी, आयसीआयसीआय बँकेच्या पाठीमागे, मु.पो. अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर या पत्त्यावर पाठवावेत तसेच अधिक माहितीसाठी मो.नं. 8600270199/9423526244 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन श्री खंडागळे यांनी केले आहे.




