श्री संत गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांची नाभिक समाजाच्या वतीने मोफत दाढी कटींग सेवा

माय मराठी न्यूज (गणेश रिकिबे)


श्री संत गजानन महाराज दिंडी शेगाव मधील वारकरी बांधवाची मोफत दाढी कटींग सेवा करण्याचा ऊपक्रम कुर्डूवाडी (ता. माढा) येथे कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने सोमवार दि. २२ जुलै रोजी घेण्यात आला. या ऊपक्रमाचा शुभारंभ संत सेवा मंडळाचे अध्यक्ष डाॅ. जयंत करंदीकर साहेब व अतुल बागल यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी डाॅक्टर असोशिएनचे अध्यक्ष हर्षद शहा, विश्वअर्पण संस्थेचे अध्यक्ष संतोष पवार, चतुर्थी उपक्रमाचे अध्यक्ष बालाजी लुक्कड, शिवराज पाटील, लखन मासाळ उपस्थित होते.
या वेळी बोलताना नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधिर भाऊ गाडेकर म्हणाले की, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हा आदर्श ऊपक्रम कुर्डुवाडीतील नाभिक समाजाने केला आहे. श्री संत सेना महाराज हे वारकरी बांधवाची दाढी कटींग करत असताना तेथील राजाचे त्यांना बोलावने आले. पण वारकरी बांधवाची दाढी कटींग करत असल्यामुळे ते राजा पर्यंत जाऊ शकले नाही. त्यामुळे राजाने संत सेना महाराजांना पकडुन आणण्याचे सैनिकांना सांगितले. त्यावेळी साक्षात विठ्ठलाने श्री संत सेना महाराजाचे रुप घेऊन राजाची हजामत केली हा ईतिहास आहे, असे या वेळी त्यांनी सांगितले.
या ऊपक्रमात ५२७ वारकरी बांधवानी मोफत दाढी कटींग सेवेचा लाभ घेतला. यासाठी सुधिर भाऊ गाडेकर, बापु दळवी, रामदास राऊत, कुमार दळवी, महेश जाधव, पोपट गाडेकर, नितीन काळे, संतोष गाडेकर, वैजिनाथ राऊत, औंकार जाधव, ईश्वर गाडेकर, नंदकिशोर वाघमारे, अजित गाडेकर, सोमनाथ राऊत, पांडुरंग राऊत, राजु सावंत, शिवतेज गाडेकर, संतोष दळवी यांचे सह नाभिक समाज बांधवांनी परीश्रम घेतले. या ऊपक्रमाबद्दल श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव यांचे कडुन सर्व नाभिक समाज बांधवाचा सत्कार करण्यात आला. ऊपक्रमासाठी शमशु धारवाले टेंभुर्णी व गोल काडादीचाळ मित्र मंडळाचे सहकार्य लाभले.




