-->
विशेष

दैवज्ञ सोनार महासंघाचे अध्यक्ष दिलीप महतकर यांची सोनार हक्क परिषदेच्या सल्लागार पदी निवड

 

माय मराठी न्यूज नेटवर्क 

 

अमरावती येथील मूळ रहिवाशी असलेले व सद्यस्थितीत मुंबई येथे स्थायिक झालेले दैवज्ञ सोनार महासंघाचे अध्यक्ष दिलीप महतकर यांची सोनार हक्क परिषदेच्या सल्लागार मार्गदर्शक पदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. 

 

महतकर यांच्या नियुक्तीबद्दल ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शेठ हिवरकर, दैवज्ञ सोनार महासंघाचे पदाधिकारी राजीव आंबेकर, विविज्ञ माधवी रत्नपारखी, मधुकर टोम्पे, एक विचार एक मंच प्रतिष्ठान छत्रपती संभाजी नगरचे सर्व पदाधिकारी, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया पुणे जिल्हा अध्यक्ष नामदेव सुवर्णकार, कार्याध्यक्ष आत्माराम ढेकळे, अखिल भारतीय सुवर्णकार समाजाच्या लातूर जिल्हा अध्यक्ष सौ. स्मिताताई पोतदार, ओबीसी हक्क परिषद दिल्ली शाखा लातूर जिल्हा अध्यक्ष मोहन पोतदार, विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्य संपर्क सुदर्शन बोराडे, लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बालाजी सुवर्णकार, यांच्यासह सुवर्णकार समाजाच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील दैवज्ञ सोनार समाज बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

दिलीप महतकर यांची सोनार हक्क परिषदेच्या सल्लागार मार्गदर्शक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून महाराष्ट्रात कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे अध्यक्ष तथा विश्वक्रांती पत्रकार महासंघ ऑल इंडियाचे संस्थापक बालाजी सुवर्णकार, दै. सकाळचे जळकोट प्रतिनिधी विवेक पोतदार, राम रत्नपारखी, विविज्ञ तथा पत्रकार संदीप बेदरे यांनी विशेष अभिनंदन करून त्यांच्या पुढील उत्कृष्ट कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close