विशेष
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या २०२४ दिनदर्शिकेचे मा.आ. रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

अकलूज/प्रतिनिधी


मकर संक्राती निमित्त शिवरत्न बंगला शंकरनगर, अकलूज (ता. माळशिरस) येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या २०२४ दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. रणजितसिंह मोहिते पाटील, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, डॉटर मॉमच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, जिल्हा सचिव प्रमोद राऊत, माळशिरस तालुका उपाध्यक्ष किरण येडगे, माळशिरस शहर सहसचिव अजित येडगे, टेंभुर्णी शहर अध्यक्ष गणेश घाडगे, इंदापूर शहराध्यक्ष सोहेल बागवान, अजय शिंदे आदीजन उपस्थित होते.




