-->
क्रीडाविशेष

दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत यश

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

           क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित, पुणे जिल्हास्तर (ग्रामीण) शालेय सिकई मार्शल आर्ट क्रिडा स्पर्धा २०२३-२४ मध्ये दत्तकला शिक्षण संस्था संचलित, दत्तकला इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या १० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

 

दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी मुलांच्या व ३० सप्टेंबर २०२३ रोजी मुलींच्या स्पर्धा पाटस येथील मेरी मेमोरियल स्कूल या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत दत्तकला शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी १४ वर्ष, १७ वर्ष, १९ वर्ष अशा विविध वयोगटांमध्ये सहभाग नोंदवून भाग घेतला होता. या मधील तीन विद्यार्थ्यांची निवड ही सोलापूर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेत झाली आहे.

 

या स्पर्धेतील विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे:-

  • १) अजय दिगंबर तीरेकर इ. ११ वी सायन्स विद्यार्थी १९ वर्षाखालील ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक.
  • २) साक्षी संदीप गायकवाड इ. ११ वी सायन्स ची विद्यार्थिनी १९ वर्षाखालील खवनके-१ या प्रकारात प्रथम क्रमांक.
  • ३) सृष्टी अशोक कांबळे इ.१२ वी सायन्स ची विद्यार्थिनी १९ वर्षाखालील एरोसिकिई या प्रकारात प्रथम क्रमांक.
  • ४) श्रावणी नंदकिशोर पाटील इ. ७ वी ची विद्यार्थिनी १७ वर्षाखालील ४४ किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक.
  • ५) प्रणव संदीप गायकवाड इ. ७ वी चा विद्यार्थी १४ वर्षाखालील एरोसिकइ प्रकारात द्वितीय क्रमांक.
  • ६) ऋतुजा सुमेरसिंग भोसले इ. ९ ची विद्यार्थिनी १७ वर्षाखालील खवनके-१ या प्रकारात तृतीय क्रमांक.
  • ७) अर्पिता बापू पोळ इ. ९ ची विद्यार्थिनी १७ वर्षाखालील ५६ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक.
  • ८) मोनिका प्रशांत तावरे इ. १२ वी सायन्स ची विद्यार्थिनी १९ वर्षाखालील ४० किलो वजनी गटात तृतीय क्रमांक.
  • ९) समृद्धी आबा जरांडे इ. ११ वी सायन्स ची विद्यार्थिनी १९ वर्षाखालील ४८ किलो वजनी गटात तृतीय क्रमांक.
  • १०) राज हरिभाऊ धुमाळ इ. ९ वी चा विद्यार्थी १७ वर्षाखालील ७० किलो खुल्या वजनी गटात तृतीय क्रमांक.

 

या सर्व विजेते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दत्तकला शिक्षण संस्थेचे क्रीडा शिक्षक प्रदीप शिवपुजे सर यांनी केले. तसेच प्रथम आलेल्या तीन विद्यार्थ्यांची सोलापूर येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. रामदास झोळ सर, उपाध्यक्ष मा. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिवा सौ. माया झोळ मॅडम, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर सर, स्कूल ऑफ डायरेक्टर प्राचार्य सौ. नंदा ताटे मॅडम (एस.एस.सी.) ज्युनिअर कॉलेज प्राचार्य सौ. सिंधू यादव मॅडम, विभाग प्रमुख प्रा. खाडे मॅडम, प्रा. धर्मेंद्र झेंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close