-->
करमाळाराजकिय

ओबीसी आरक्षण निकालाचे करमाळा भाजपाच्या वतीने पेढे वाटून स्वागत

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

 

सर्वोच्च न्यायालयात आज (दि.१९ जुलै) रोजी ओबीसीं च्या बाजूने निकाल दिला गेला आहे. त्या निर्णयाचे स्वागत करमाळा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले. यावेळी पक्षाच्या करमाळा येथील संपर्क कार्यालयात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

 

 

यावेळी बोलताना करमाळा तालुकाध्यक्ष श्री. गणेश चिवटे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झाला होता, तो सोडविण्यासाठी बांठीया आयोगाची नेमणूक करण्यात आली. त्या आयोगाने आज सर्वोच्च न्यायालयाच्या समोर इम्पेरिकल डेटा सादर केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणा नुसार निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला आहे.

 

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस दीपक चव्हाण, शहर अध्यक्ष जगदीश अग्रवाल, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, व्यापार आघाडीचे शहराध्यक्ष जितेश कटारिया, शिवसेना माजी तालुका उपप्रमुख बंडू शिंदे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, चेअरमन दासाबापू बरडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, ओबीसी मोर्चाचे तालुका सरचिटणीस भैयाराजे गोसावी, पांडे गावचे उपसरपंच नितीन निकम, नवनाथ नागरगोजे, नाना अनारसे, संजय किरवे, मनोज मुसळे, शैलेश राजमाने, विशाल घाडगे, गणेश गोसावी, सोमनाथ भागडे, संतोष फुंदे, शरद कोकीळ, पप्पू काळे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close