-->
करमाळामनोरंजनमहिलाविषयक

वाशिंबेत जागतिक महिला दिनानिमित्त ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रम ऊत्साहात संपन्न

 

प्रतिनिधी/वाशिंबे (माय मराठी न्यूज)

 

वाशिंबे (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘न्यू होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्पर्धेने होम मिनिस्टर कार्यक्रमात महिलांचा उत्साह संचारला होता. महिला दिनाचे औचित्य साधून वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगलेला हा खेळ पैठणीचा या कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध खेळांचा आनंद लुटला. पैठणी, सोण्याची नथ, चांदीचा छल्ला अशा प्रकारची विविध बक्षिसेही यावेळी महिलांनी पटकावली.

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते. कार्यक्रमासाठी परिसरातील महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीथ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. वाशिंबे परिसरात होम मिनिस्टर कार्यक्रमाचे प्रथमच आयोजन होत असल्याने महिलांमध्ये याविषयी उत्सुकता पहायला मिळाली. प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदार्‍या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. अशा कार्यक्रमातून तिच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

अँकर अपर्ना यांनी महिलांसाठी विविध खेळाच्या फेर्‍या घेतल्या. विविध स्पर्धेचे टप्पे पार करुन महिलांनी बक्षिसांची लयलुट केली. यामध्ये विजेत्या ठरलेल्या भक्ती तेजस कळसाईत पैठणी बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. द्वितीय बक्षिस जयश्री रमेश सपकळ यांना सोन्याची नथ तर तृतीय विजेत्या सिद्धी प्रताप पाटील यांना चांदीचा छल्ला असे बक्षीस देण्यात आले. तसेच ५० महिलांना प्रोत्साहन पर आकर्षक बक्षीस देऊन ३५०० सँनिटरी पँडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close