करंदी गावच्या सरपंच पदी सोनाली ढोकले यांची बिनविरोध निवड
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


करंदी, ता.शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली किरण ढोकले तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोनाली ढोकले यांचा सरपंच पदासाठी व पांडुरंग आनंदराव ढोकले यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच, उपसरपंच यांचा शुभेच्छा सभा घेऊन नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संजीव साळवी, तलाठी अमोल कडेकर, ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे यांनी काम पाहिले.
याप्रसंगी शिरूर तालुक्याचे माजी आमदार सुर्यकांत पलांडे, पोपटराव गावडे, पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शंकरदादा जांभळकर हे उपस्थित होते.
करंदी गावच्या माजी सरपंच सुभद्रा ढोकले, माजी उपसरपंच बबलू ढोकले, ग्रामपंचायत सदस्य संदिप ढोकले, नितीन ढोकले, शिवाजी दरेकर, अंकुश पंचमुख, सुनिता ढोकले, शोभा दरेकर, शारदा ढोकले, रेखा खेडकर, उज्वला नप्ते, सुहासनाना ढोकले, संतोष ढोकले, दिलीप ढोकले, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोरक्ष ढोकले, वसंतदादा ढोकले, सैनिकभाऊ ढोकले, शरद ढोकले, नरसिंग ढोकले, राजाभाऊ ढोकले, पोपट नप्ते, बाबाजी कंद्रुप, सागर झेंडे, माऊली दरेकर, विशाल खरपूडे, नितीन कदम, लहु दरेकर, बाप्पू दरेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सोनाली ढोकले ह्या सरपंच पदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून गावच्या विकासकामांना अधिकाधिक गती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकाच कुटुंबात चौथ्यांदा सरपंच पद
यापूर्वी दिवंगत स्व. माऊली ढोकले यांनी दोन वेळा करंदी गावचे सरपंच पद भुषविले तसेच शिरूर पंचायत समितीचे सदस्य म्हणून देखील काम करण्याची संधी देखील त्यांच्या रूपाने गावाला मिळाली. त्यानंतरच्या काळात संतोष ढोकले हे देखील सरपंच होते. यांनी गावच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्याचीच पावती म्हणून करंदी गावच्या ग्रामस्थांनी विश्वास दाखवून माझ्यावर सरपंच पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन.
-सोनाली बंटी पाटील ढोकले, नवनिर्वाचित सरपंच, करंदी.



