-->
करमाळामाहिती विषयकराजकिय

उजनी प्रकल्पांतर्गत पुनर्वसीत गावठाणांसाठी २ कोटी २० लाखांचा निधी मंजूर; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

उजनी प्रकल्पाअंतर्गत मौजे वांगी एक खातगाव नंबर दोन, सोगाव पश्चिम, रिटेवाडी, वांगी नंबर २ व कविटगाव या पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधा कामांसाठी ०२ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

 

 

वांगी नंबर १ येथे सिमेंट काँक्रेट गटर बांधणे या कामासाठी १६ लाख ८ हजार ६८८ रुपये, खातगाव नंबर २ येथे सिमेंट काँक्रेट गटार बांधण्यासाठी २५ लाख ५९ हजार ९५ रुपये, पोमलवाडी येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधण्यासाठी ४३ लाख ९८ हजार २८० रुपये तसेच पोमलवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी १३ लाख ६३ हजार ५९५ रुपये, सोगाव पश्चिम येथे अंतर्गत खडीकरण कामासाठी ३४ लाख ८५ हजार ४९ रुपये, रिटेवाडी येथे अंतर्गत खडीकरण कामासाठी १५ लाख ३ हजार ९२८ रुपये, वांगी नंबर २ येथे सिमेंट काँक्रीट गटार बांधकामासाठी १७ लाख ०२ हजार ५३९ रुपये, कविटगाव येथे स्मशानभूमी पोहोच रस्ता व अंतर्गत खडीकरण कामासाठी ५३ लाख ४८ हजार ८३२ रुपये असा एकूण ०२ कोटी १९ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.

 

 

दिनांक २९ जुन २०२२ च्या शासन निर्णयानुसार सदर कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळालेली असून पुनर्वसीत गावठाणा मधील प्रलंबित कामासाठी हा निधी उपयुक्त असल्यामुळे या भागातील प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी या गावांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या गावातील ग्रामस्थांकडून आमदार संजय मामा शिंदे यांचे आभार मानले जात आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close