केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबा मंदिरातील शिवलिंगाची पुजा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्त तिरंगा ची सजावट करून करण्यात आली आहे. सदर सजावट ही भैय्या मोकाशी यांनी केली आहे. तर मंदिरातील फुललांची सजावट कुंडलिक तळेकर, शुभम मारवाडी, गणेश गुरव, बाळु गुरव, शुभम साखरे यांनी केली. श्रावण महिन्यात भैय्या मोकाशी हे वेगवेगळ्या सजावट मंदिरात करत आहेत.
तसेच शुभम वेदपाठक या चित्रकाराने तिंरगाची रांगोळी वेगवेगळ्या कलरने काढली आहे. ही रांगोळी अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. आज १५ ऑगस्ट निमीत्त राजस्थानचे भाविक राधेश्याम एम. अग्रवाल यांनी आरती करण्याचे मशीन मंदिरास भेट दिली. याबद्दल देवस्थानचे सदस्य कुंकू कारखानदार मनोज सोलापूरे यांनी अग्रवाल यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी भैरू शिंदे, ज्ञानेश्वर दिक्षीत, बलभीम बिचीतकर, पत्रकार संजय जाधव मच्छिंद्र राऊत, संभाजी गुरव व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




