धुलीवंदन व रंगपंचमी निमित्त महिलांसाठी आयोजित विविध स्पर्धां उत्साहात संपन्न
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


धुलीवंदन व रंगपंचमीच्या निमित्ताने कोरेगाव भीमा ग्रामपंचायत च्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या अर्चना निखिल सुपेकर यांच्या संकल्पनेतून विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन महिलांसाठी करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विविध वयोगटातील मुली, महिला यांनी सक्रिय सहभाग घेतला.
येथील अष्टविनायक प्रतिष्ठान व श्री भैरवनाथ मंदिरांच्या परिसरात या स्पर्धां घेण्यात आल्या. यामध्ये संगीत खुर्ची, फुगे फोडणे, चेंडू फेक आदी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विजेते पुढील प्रमाणे : सोनाली पप्पू शिनगारे (संगीत खुर्ची), दिक्षा प्रविण गव्हाणे (फुगा फोडणे), शुभांगी विनोद दौंडकर (चेंडू फेक) विजेत्या स्पर्धकांना निखिल सुपेकर यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन ज्येष्ठ महिलांच्या हस्ते गौरविण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे महिलांना कोणत्याही प्रकारे सार्वजनिक रित्या खेळ खेळता येत नव्हते. परंतु, अश्या प्रकारच्या स्पर्धांमुळे महिलांमधील सुप्त गुणांना वाव मिळत असतो. तसेच असे उपक्रम प्रत्येक मंडळांनी घ्यावेत, अशी विनंती यावेळी बेबी शिंदे, मनीषा सासवडे, स्वाती गव्हाणे, सोनाली शिनगारे, पूजा शिंदे, हर्षदा सुपेकर व सर्व महिलांनी केली. तसेच या सर्व महिलांनी अर्चना सुपेकर यांचे कार्यक्रमाचे नियोजन केल्यामुळे आभार मानले.
या स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन निखिल सुपेकर, विशाल गव्हाणे, रोहित सुपेकर, मंगेश सुपेकर आदींनी केले.




