प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


केसनंद, ता. हवेली येथे वाढते नागरीकीकरण व औद्योगिक परिसर असल्यामुळे औद्योगीकरणाला विजेचा पुरवठा कमी पडत होता. त्यामुळे लघुउद्योगांना वीज पुरवठा कमी प्रमाणात झाल्यामुळे नुकसान होत असे. परिसरामध्ये विद्युत रोहित्र अपुरी पडत होती. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महावितरण नियंत्रण समितीचे सदस्य प्रदीप वसंत कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा शोभा हरगुडे, दिलीप हरगुडे यांनी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यासाठी शिरूर-हवेली चे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्याकडे मागणी करून व महावितरणकडे पाठपुरावा करत आमदार निधीतून ०९ लाख रुपयांचे विद्युत रोहित्र बसविण्यात आले.
रोहित्राचे लोकार्पण महावितरण नियत्रंण समिती प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शोभा हरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी केसनंदचे माजी सरपंच चंद्रकांत सातव, शिवराय प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवाजी हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य बाबा हरगुडे, आव्हाळवाडीचे माजी सरपंच संदेश आव्हाळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष लोचन शिवले, तंटामुक्तीचे अध्यक्ष दिलीप हरगुडे, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मंगेश सातव, युवक उपाध्यक्ष हवेली श्रीकांत पाटोळे, लहू हरगुडे, विकास हरगुडे, अभिमन्यू हरगुडे, संजय जाधव, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष भरत चव्हाण, महेबुब शेख, भाजपाचे हवेली उपाध्यक्ष सचिन हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेस हवेली महिला उपाध्यक्ष सीता जाधव, उपाध्यक्ष नम्रता कांबळे, माधुरी वाळके, कविता शेडगे, रोहिणी पवार, अलका गावडे, संध्या भोर, आशा साळुंखे, महावितरण वायरमन दिपक यादव व कर्मचारी उपस्थित होते.




