-->
करमाळासामाजिक

विक्रम दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुननगर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

कमलाभवानी शुगर्सचे चेअरमन व माढा पंचायत समितीचे सभापती मा. श्री. विक्रम दादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अर्जुननगर ता. करमाळा येथील युवा नेते, प्रगतशील बागायतदार व शिंदे गटाचे नेते समाधान (मालक) भोगे यांचेकडून जिल्हा परिषद शाळा अर्जुन नगर येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळे वाटप करण्यात आली.

 

समाधान (मालक) भोगे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, भविष्यात शाळेत ज्या अडी-अडचणी येतील त्या विक्रम दादा शिंदे यांच्या मार्गर्शनाखाली निश्चित पणे सोडवू. शाळेसाठी कोणत्याही साहित्य अथवा गोष्टीची गरज पडल्यास शिक्षकांनी मला सांगावे. शाळेला व विद्यार्थ्यांना भविष्यातही हवी ती मदत करू असे आश्वासन दिले.

 

यावेळी सरपंच श्री. प्रकाश थोरात, सामाजिक कार्यकर्ते श्री. भाऊसाहेब आडसुळ, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. सोमनाथ ढवळे, ग्रामसेवक श्री. मनोज लटके, श्री. विलास ननवरे, श्री. संदीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उदयसिंह काटूळे सर यांनी तर आभार श्री. अमोल राऊत सर यांनी मानले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजू कांबळे सर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. माने एन.एस. सर व बलभीम बनसोडे सर आदींनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close