-->
राज्यविशेषसामाजिक

रोटरी क्लब ऑफ पुणे व केमिस्टॉल इंडिया कंपनीच्या माध्यमातून प्राथमिक शाळेला टॅब भेट

सी एस आर फंडाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या अंतर्गत येणाऱ्या नरेश्वर वस्ती जिल्हा परिषद शाळेला रोटरी क्लब ऑफ पुणे व केमिस्टॉल इंडिया कंपनीच्या माध्यमातून ३ री व ४ थी च्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक टॅब वाटप करण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.

 

 

ग्रामीण भागातील पालकांची कोरोणामुळे आर्थिक दुरावस्था झाली असली तरी त्यांच्या मदतीला औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणावर येत असते. माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र भांडवलकर यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला टॅब मिळण्यास मदत झाली असून त्यांच्या या कार्याबाबत उपस्थितांनी अभिनंदन केले तर पालकांनी आभार व्यक्त केले. यावेळी केमिस्टॉल कंपनीचे आनंद सर, वाबळे सर, रोटरी क्लबचे आशिष सर, अभ्यंकर सर, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र भांडवलकर, सदस्य जयश्री गव्हाणे, दिपक गव्हाणे, मुख्याध्यापिका शुभांगी काटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश पटाईत, शिक्षणतज्ञ कावेरी देवकर आदी यावेळी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रांत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या चांगल्या लोकांमुळे अडचणी दूर होत असतात. नरेश्वर वस्ती जि.प.प्राथमिक शाळेची डिजिटल स्कूल कडे वाटचाल सुरू झाली असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र भांडवलकर यांनी सांगितले.

 

 

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक लहू चव्हाण यांनी तर आभार मुख्याध्यापिका शुभांगी काटे यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close