-->
करमाळाक्राईम

केम येथील कृषी सेवा केंद्रात चोरी; शटर उचकटून ३० हजाराची रक्कम लंपास

 

 

केम प्रतिनीधी/संजय जाधव

 

 

करमाळा तालुक्यातील केम येथे सोमवार दिनांक ०७ फेब्रुवारी रोजी पहाटे एका कृषी सेवा केंद्र असलेल्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने दुकानाच्या गल्ल्यातील ३० हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे. यामध्ये अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी दुकानदार संतोष देवकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

 

केम येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराशेजारी देवकर यांचे कृषी सेवा केंद्राचे दुकान आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास दुकान बंद केले. त्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ते दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. देवकर यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी दुकानात प्रवेश केला नंतर दुकानातील टेबलच्या कँउंटरमध्ये ठेवलेले पैसे पहिले तेव्हा ते दिसून आले नाहीत.

 

 

याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close