-->
क्राईमराज्य

धक्कादायक! स्वयंपाकास उशीर झाल्याने पतीने पत्नीला जिवंत जाळलं; आरोपी पतीला अटक

 

 

 

माय मराठी न्युज नेटवर्क

 

 

जेवण करायला उशीर झाल्यामुळे आरोपी पतीने पत्नीवर डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पुणे नजिक पिंपरी चिंचवड परिसरातील नेहरू नगरमध्ये घडली आहे. येथे राहणाऱ्या एका तरुणाने आपल्या पत्नीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. घडलेल्या या धक्कादायक घटनेने पुणे हादरले आहे. या आरोपी तरुणाने पत्नीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. केवळ स्वयंपाक करण्यास उशीर झाल्यामुळे आरोपीने तिच्यावर डिझेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

 

 

 

याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. बाबू उर्फ ​​राहुल विठ्ठल पारधे (वय २८ वर्ष) असे आरोपी पतीचे नाव आहे. तो पिंपरी परिसरातील नेहरू नगर येथील रहिवासी आहे. याप्रकरणी २८ वर्षीय पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी (शनिवारी) महिलेला स्वयंपाक करायला उशीर झाला होता. त्यामुळे वेळेवर जेवण न मिळाल्याने चारित्र्यावर संशय घेऊन आरोपीने तिच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून दिले. पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आरोपी पती राहुल पारधे याच्याविरुद्ध कलम ३०७ अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केवळ जेवण बनवायला उशीर झाल्याच्या कारणातून आरोपी पतीनं पत्नीला अमानुष शिक्षा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close