-->
आरोग्यसामाजिक

पोलिसांची मोफत आरोग्य तपासणी; शांताई हॉस्पिटलचा कौतुकास्पद उपक्रम

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

पेरणे फाटा, ता. हवेली येथील शांताई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आणि लोणीकंद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने लोणीकंद पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या अँटीजण टेस्ट यासह बीपी, शुगर याची तपासणी करण्यात आली. यावेळी शांताई मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या वतीने अँटिकोव्हिड औषध तसेच मास्क, सॅनिटायझर, प्राथमिक प्रथम उपचार औषधे यांचे वाटप करण्यात आले.

 

 

आरोग्य तपासणी उपक्रमाचे अंतर्गत जवळपास ६० ते ७० अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी लोणीकंद पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्यासह शांताई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉ. शिवांजली गणेश पोटभरे (वाळके पाटील) व शांताई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. गणेश सोपान पोटभरे हे उपस्थित होते.

 

 

यावेळी शांताई हॉस्पिटलच्या प्रज्ञा धुमाळ, शुभांगी इनामके, मनिषा ससाने, मार्टिना रणवरे, अश्विनी पाळंदे, पोर्णिमा सरकार, सीमा गावडे, हर्षदा नलावड़े, संतोष तांबे, गणेश कांबळे आदींनी सर्व अधिकारी-कर्मचारी यांची तपासणी केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close