-->
करमाळामहिलाविषयकविशेष

केम येथे ‘आम्ही लेकी जिजाऊ सावित्रीच्या’ हा नवदुर्गाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

 

 

 

प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी “आम्ही लेकी जिजाऊ सावित्रीच्या”नवदुर्गा यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गट विकास अधिकारी श्री. मनोज राऊत साहेब हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस परमपूज्य डॉ. बापुजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर मा. जिजाऊ साहेब, सावित्रीबाई फुले आणि संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांचे उपस्थित नवदुर्गाच्या हस्ते पूजन करण्यात आले.

 

 

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी श्री. मनोज राऊत यांनी महिला सबलीकरण व आजची स्त्री या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात असलेल्या या कॉलेज मधील नवोपक्रमाचे व येथील विद्यार्थ्यांचे देखील त्यांनी विशेष कौतुक केले. केम ग्रामपंचायत सदस्या सौ. कौशल्याताई सागरराजे दोंड यांनी स्त्री स्वातंत्र्य व तिचे अधिकार यावर मौलिक मार्गदर्शन केले. शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ. उज्वलाताई संदीप तळेकर यांनी आधुनिक काळात स्त्रियांचे बरोबरीचे योगदान यावर मार्गदर्शन केले. नवदुर्गा सौ. विमल विठ्ठल रायचूरे यांनी आपला संघर्षमय जीवन प्रवास सांगून त्यावर केलेली यशस्वी मात सांगून उपस्थितांचे मनोबल वाढविले. शालेय समिती अध्यक्ष श्री दयानंद तळेकर यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील स्त्रियांचे योगदान सांगितले. प्राचार्य श्री. विष्णु कदम यांनी सावित्रीबाई फुले आणि मा जिजाऊ साहेब यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रकाश टाकला.

 

 

 

या कार्यक्रमात केम परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्ववान व नावलौकिक मिळविलेल्या नऊ महिलांचा गुणगौरव करण्यात आला. यामध्ये सौ. अलका दादासाहेब गोडसे, सौ. सुवर्णा अविनाश पवार, सौ. अन्नपूर्णा मुकेश राऊत, सौ. जरीना दिलदार पठाण, सौ. विमल विठ्ठल रायचूरे, सौ. छाया नागनाथ रणशुंगारे, सौ. चंद्रकला नामदेव घोडके, सौ. प्रगती युवराज तळेकर, कु. लक्ष्मी दत्तात्रय देवकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी राऊत व कु. पूजा वायभासे या विद्यार्थिनीनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी तर प्रा. संतोष साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष श्री. संदीप तळेकर, श्री. सचिन रणशूंगारे, श्री. संभाजी गुरव, प्रा. अमोल तळेकर, प्रा. सतीश बनसोडे, श्री. सरफराज मोमीन, श्री. सागर महानवर, शालेय समिती सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close